नवी दिल्ली | David Warner Wishes Indians On Ganesh Chaturthi – सध्या संपूर्ण देशात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी गणपती बाप्पाचं भक्तीभावानं आगमन झालं आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचं आगमन झालं आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याचा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. तसंच त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
डेव्हिड वाॅर्नरने गणेश चतुर्थीनिमित्त सर्व भारतीयांना पोस्ट शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तो बाप्पासमोर नतमस्तक झाला आहे. बाप्पाला हात जोडतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच “भारतातील माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदमय होवे,” अशा सदिच्छादेखील त्याने दिल्या आहेत. त्याच्या या खास पोस्टवर भारतीय क्रिकेटप्रेमी कमेंट्स करत आहेत.
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरचे भारतात लाखो चाहते आहेत. दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूने साकारलेले पुष्पा चित्रपटातील पुष्पराज हे पात्र वॉर्नरला खूप आवडते. तो अनेक सामन्यांमध्ये पुष्पा चित्रपटातील ‘झुकेगा नही’ हा डायलॉग म्हणताना दिसलेला आहे. तसंच पुष्पाची अॅक्शनदेखील त्याने अनेकवेळा केलेली आहे. याच कारणामुळे भारतात त्याचे खास चाहेत असून त्याला क्रिकेटमधील पुष्पा म्हटलं जातं.