पंढरपूर | देवभूमी पंढरपुमध्ये एक खळबळ जनक घटना घडली आहे. पंढरपूर शहरात दहा वर्षाच्या मुलाचा अतिशयवाईट अवस्थेत मृतदेह आढळला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले चौकात कृष्णा तीम्मा धोत्रेचा शौचालयजवळ आज सकाळी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. या मुलाचा खून कुणी आणि कशासाठी केला, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहे.
या 10 वर्षांच्या बालकाचे नाव कृष्णा असे आहे. कृष्णाचे नातेवाईक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. मात्र, 10 वर्षीय कृष्णाचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.