उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, 20 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी

मुंबई | Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुंकेश अंबानींकडे 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. तसंच जर पैसे दिले नाही तर जीवे मारू असं धमकी देणाऱ्यानं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींना ईमेलमार्फत धमकी देण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानींच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीनं धमकीचा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्यानं लिहिलं होतं की, जर तुम्ही आम्हाला 20 कोटी रूपये दिले नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. तसंच भारतातील सर्वोत्तम नेमबाज आमच्याकडे आहेत.

मुकेश अंबानींना आलेला धमकीचा मेल पूर्णपणे इंग्रजीमध्ये लिहिण्यात आला होता. तर धमकीचा हा मेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानींच्या सुरक्षा प्रभारींनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. तसंच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकणाचा कसून तपास करत आहेत.

Sumitra nalawade: