मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धमकीचे फोन (Threats Call) आल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांना बुधवारी दिवसभरात धमकीचे दोन फोन आले. तसंच फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.