शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे.

‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी गेले आहे. पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल घेत कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Sumitra nalawade: