टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दीपक चहरने IPLच्या 2021च्या एका सामन्यात स्टँडमध्ये प्रियेशी जया भारद्वाजला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं. जयाने ‘हो’ म्हणत त्याच्या प्रेमप्रस्तावावर शिक्कामोर्तबही केलं. तेव्हापासून सतत चर्चा सुरु होती की, दीपक जयाशी कधी लग्न करेल. पण आता हा खेळाडू लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
दरम्यान त्याने आता लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक आणि जया यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपक चहर गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आयपीएल मेगा लिलावात त्याला चांगलीच बोली लागली होती. मात्र या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे दीपक एकही सामना खेळू शकला नाही.
जया आणि दीपक यांनी लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जया आणि दीपक यावर्षी 21 जून रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दिपक बराच काळ क्रिकेटपासून दूर होता, मात्र आता त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपक चहरची प्रियेशी जया ही ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे.