मुंबई : (Deepak Kesarkar On Sanjay Raut) शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका बाजूला शिंदे गटातील बंडखोर हे उद्धव ठाकरे यांना सर्वस्व मानत असले तरी या सर्व आमदारांचा रोष हा राऊरांवर असल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, आम्ही २०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेची युती करून मतं मागायला गेलो होतो. महाराष्ट्रातील जनतेनं आम्हाला आशिर्वाद रुपी बहुमत दिलं होतं. ती मतं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मताचा सन्मान व्हायला हवा. पण महाविकास आघाडीमुळे पराभूत झालेली लोक सत्तेवर आली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मनात आमच्याविषयी गैरसमजाची जी दरी निर्माण झाली आहे. ती येत्या काळात भरून निघेल, असा विश्वासही यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला आहे. राऊतांवर बोलताना ते म्हणाले, माझं असं मत आहे संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत.
एकनाथ शिंदे नेते यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. हे बंड यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.