“मातोश्रीवर बोलावलं तर जावू पण…”; शिंदे गटाची एक अट!

मुंबई : (Deepak Kesarkar On Shivsena) शिवसेना आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही बाजूनं आरोप-प्रतिआरोप होत आहेत. शिवसेनेकडून केलेल्या टिकेला शिंदे गटाकडून त्याच प्रकारे उत्तर देण्यात येत आहे. हा वाद टोकाला जात असतानाच बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्त्ये दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानमुळे आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गटात हात मिळवणी होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गुरुवार दि. ०७ रोजी एकनाथ शिंदे यांनी मंत्रायलातून मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रवक्त्ये केसरकर माध्यमांशी बोलत होते. माध्यमांनी त्यांना ‘मातोश्री’वरून बोलवणं आलं तर जाल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केसरकर म्हणाले की, आम्ही आता सत्तेमध्ये भाजपसोबोत आहोत. आमचं आणि त्यांचं आता एक कुटुंब तयार झालं.

आम्ही एकटे नसून आमच्या कुटुंबात भाजप देखील आहे. त्यामुळं आता आम्हाला बोलताना त्यांना भाजपलाही बोलवावं लागेल. अशी प्रकारची अटचं केसरकर यांनी मातोश्रीवर जाण्यासंदर्भात ठेवली आहे. केसरकर यांनी यावेळी मातोश्रीजवळ असलेली चौकडी बाजूला करण्याची मागणी देखील केली आहे. त्यांना शिवसेनेतून काढून टाकू नका, पण थोडं दूर ठेवा, असंही ते म्हणाले आहेत. केसरकर यांच्या या मागणीला शिवसेनेकडून कशा प्रकारे उत्तर मिळतं हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: