“चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका असं कुठेही म्हटलं नाही” दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

मुंबई – Shivsena Party Crisis and Supreme Court : शिंदे गटातील १६ आमदार अपात्र असल्याच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. मात्र, कोर्टाकडून पुन्हा एकदा सुनावणीसाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे. सोमवारी (८ ऑगस्ट) पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी पार पडल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याच्या सूचना कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या असल्याची माहिती होती. त्यावर अशा कोणत्याही सूचना कोर्टाने दिल्या नाहीत असं स्पष्टीकरण दीपक केसरकारांनी दिलं आहे.

कोर्टात प्रकरण सुरु असताना त्यावर मत प्रदर्शन करणे चुकीचे आहे. मिडीया ट्रायल्स व्हायला नको. आजच्या सुनावणीनंतर काही जणांकडून चुकीच्या बातम्या चालवण्यात आल्या आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणतेही आदेश कोर्टाने दिलेले नाहीयेत. वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

शिवसेनेच्या वकिलांकडून वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. वकिल काय म्हणतात यापेक्षा कोर्टाची ऑर्डर वाचा. मी कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली आहे. असं स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी दिलं आहे.

Dnyaneshwar: