मुंबई : (Deepali Sayyad On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिंदे-ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्याकडून बरेच प्रयत्न झाले. मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही. मधल्या काळात दीपाली सय्यद नाराज असल्याच्या चर्च्या होत्या. याच कारणामुळे त्या शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्या म्हणाल्या, माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. असं दीपाली सय्यद यांनी स्पष्टपणे सांगितले. मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते, असेही दीपाली सय्यद यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती, असेही दीपाली सय्याद म्हणाल्या. माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.