नवी दिल्ली : (A Maulvi Raped 12 years boy in sarai rohilla Delhi crime) दिल्लीत दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १२ वर्षाच्या मुलाला बेशुद्ध करून एका मौलवीने त्याच्यावर अनेकदा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर दिल्लीतील सराय रोहिल्ला परिसरात ही घटना घडली आहे. कालच दिल्लीमध्ये दोन मुलांकडून एका बारावीच्या मुलीवर असिड अटॅक (Acid Attack) करण्यात आला होता. (A Maulvi Raped 12 years boy in sarai rohilla Delhi crime)
दरम्यान, १२ वर्षाच्या मुलावर बलात्कार बलात्कार करणारा मौलवी फरार असल्याची माहिती आहे. मोहम्मद इस्रान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी पॉक्सो कायदा कायद्यांतर्गत आयपीसी कलम 377, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सागर सिंग कलसी, डीसीपी उत्तर दिल्ली यांनी दिली आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.