नवी दिल्ली : (Delhi High Court hearing of Shiv Sena) शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. शिवसेनेकडून जवळपास तासभर करण्यात आलेल्या युक्तीवादवर न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी होईल असं जाहिर केलं आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरे गटाने आपल्या वकिलांमार्फत केला आहे. या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामे खोळंबली असून या नवीन नावामुळे आणि गोठविलेल्या नावामुळे माझ्या अशीलांच्या पक्षावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसंच निवडणूक चिन्ह निर्देशानुसार आवश्यक परिणामांची पूर्तता केल्याशिवाय भारतीय निवडणूक आयोगाने हा निकाल दिला गेला आहे.
निवडणूक आयोगाने प्रथम दर्शनी जे दिसत आहे त्याच्या आधारे निकाल दिला आहे त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठविता येणार नाही. मी माझ्या वडिलांनी दिलेलं नावाने चिन्ह वापरू शकत नाही का? आयोगाने दिलेले निर्देश बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलाने केला आहे.
ठाकरेंच्या पक्षावरील दावा आणि अधिकार कायम असून निवडणूक आयोग त्यामुळे सध्या जारी करण्यात आलेले आदेश तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि ठाकरेंनी सादर केलेल्या पुरावांची दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयाल देवू शकतं असं न्यायालयाने सांगितलं आहे.