दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये बॉम्ब ठेवल्याची ईमेल द्वारा धमकी; तपास सुरू

दिल्ली | Delhi Public School, Mathura Road येथे बॉम्ब ठेवल्याची ईमेल द्वारा धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान Deputy Commissioner of Police South Chandan Choudhary यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हा ‘बनावट कॉल’ असल्याचं म्हटलं आहे. 12 एप्रिल रोजी सादिक नगरच्या इंडियन स्कूलमध्ये अशीच घटना घडल्यानंतर महिनाभरात शहरातील शाळेला बॉम्बची धमकी मिळण्याची ही दुसरी घटना आहे. बॉम्बची धमकी असलेला ई-मेल आल्यानंतर शाळा रिकामी करण्यात आली होती.

Dnyaneshwar: