मुंबई | Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाली आहे. याबाबतची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. अजित पवार हे मागील दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहीले नव्हते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता प्रफुल्ल पटेल यांनी माहिती देत या चर्चांना पूर्णविराम लगावला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, शनिवारी अजित पवारांना डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्यामुळे अजित पवारांनी पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच ते पूर्णपणे बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी परततील. सध्या अजित पवारांवर घरातच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काल अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरून त्यांचा बारामतीचा दोरा रद्द केला होता. कारण, मराठा समाजाच्यावतीनं राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसच अजित पवारांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा समाजानं त्यांना विरोध केला होता. त्यामुळे अजित पवार हे बारामतीला न जाता ते पुण्यात दाखल झाले होते.