जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो : गुलाबराव पाटील

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यापुर्वी सभेला संबोधित करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अडीच वर्षांच्या कार्यकाळात चांगलं काम झालं आहे. यावेळी ते म्हणाले की, तुमचा पणजोबा खापर पणजोबा आले तरी शिवसेना संपू शकत नाही. शिवसेनेच्या जिवावर अनेकजण मोठे झाले आहेत. देशात उद्धव ठाकरे सर्वोकृष्ठ मुख्यमंत्री आहेत असं म्हणत त्यांनी जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो असे विधान पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवर कुणी बोलत नाही असे म्हणत भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं कुणावर हल्लाबोल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Prakash Harale: