‘मुख्यमंत्र्यांना मिळणार करारा जवाब?’ फडणवीसांची आज मुंबईत प्रतिउत्तर सभा

मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत उत्तर सभा घेतली. सभेत त्यांनी विरोधी पक्ष, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण साचांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या टीकांना प्रतिउत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुंबईत सभा घेणार आहेत.

मुंबईमधील गोरेगाव भागात भाजपकडून आज सभा आयोजित केली जाणार आहे. मात्र फडणवीसांची ही सभा पूर्वनियोजित होती. मात्र फडणवीस या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा टीकेला प्रतिउत्तर देणार अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणातील टीकेला फडणवीसांनी ट्विट करून टीका केली आहे, ट्विट मध्ये त्यांनी म्हटलंय की, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत, विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट.. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा.” असा इशाराच फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

Dnyaneshwar: