पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका (Kasba Bypoll Election) जाहीर झाल्यापासून या निवडणुका राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उडी घेतल्यामुळे या दोन्ही निवडणुका टक्करच्या होणार असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. भाजपची तब्बल 7 तास बैठक पार पडली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस एकूण चार मंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतली आहे. ज्यांचा पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात मोठा व्यापारी वर्ग आहे.
भाजपसाठी ही नवडणूक महत्वाची असल्याने भाजपकडून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील निवडणुकीत लक्ष घालत आहेत. त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), गिरीश महाजन (Girish Mahajan), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची उपस्थिती होती. याशिवाय बडे उद्योजक असलेले पुनीत बालन आणि फत्तेचंद रांका हे देखील बैठकीला उपस्थित होते. प्रचार सभा आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचे मुद्दे याशिवाय याच काळात केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) देखील प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व घडामोडी यावर बैठका आणि काही उपाय सुचवले असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय घेतली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.