मुंबई : (Devendra Fadanvis Reaction On Bhagat Singh Koshyari And Sudhanshu Trivedi’s
Controversial Statements On Chhatrapati Shivaji Maharaj) काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी (CHhatrapati Shivaji Maharaj) हे जुन्या काळातील हिरो होते. आता नितीन गडकरी (Nitin Gadakari) हे तुमच्यासाठी हिरो असल्याचं वक्तव्य विद्यार्थ्यांसमोर केलं होतं. त्याचबरोबर कालच एका हिंदी टीव्ही चॅनलवर प्रतिक्रिया देताना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी (BJP’s Spoksperson Sudhanshu Trivedi) देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) वक्तव्य केलं होतं त्यावरून देखील राज्यभरातून मोठ्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राज्यपालांनी राजीनामा द्यावा (GoBack) आणि सुधांशू त्रिवेदी यांनी राज्याची माफी मागत आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी राज्यातील लोक करत आहेत. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, चोवीस तासानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadanvis Reaction On Bhagat Singh Koshyari And Sudhanshu Trivedi’s Controversial Statements On Chhatrapati Shivaji Maharaj
“छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी कायम आदर्श आहेत आणि राहतील. आमच्यासाठी हिरो देखील तेच आहेत. त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. याबाबत राज्यपालांच्या मनात देखील शंका नाहीये. त्यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले आहेत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर “भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू यांनी कुठेही महाराजांनी औरंगजेबाला पत्र देऊन माफी मागितली असं म्हटलं नाहीये. मी त्याचं वक्तव्य नीट ऐकलं आहे.” अशी प्रतिक्रिया सुधांशू यांच्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी दिली आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी, “सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. आणि ब्रिटिशांना मदत देखील केली होती.” असं वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजप नेते मोठ्या प्रमाणात संतापले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर थोड्याच वेळानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, शिवाजी महाराजांवरील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चोवीस तासांनी फडणविसांनी प्रतिक्रिया दिली. अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुलं गांधींच्या वक्तव्याला धरून एक वक्तव्यं केलं होतं. “सावरकरांनी ब्रिटिशांना माफीसाठी पत्र लिहिले होते. यात वेगळं काही नाहीये. त्याकाळी माफीसाठी पत्र लिहिणे सर्वसाधारण गोष्ट होती. छातार्पती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं.” असं वक्तव्य सुधांशू यांनी केलं आहे.