मुंबई : (Sanjay Kute On Devendra Fadnavis) मागील १०-१२ दिवसापासून जो सत्तासंघर्ष घडला. हे सत्तानाट्यंतर महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ऐतिहासिक सत्तानाट्य आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार आहेत हे नाकारता येणार नाही. त्यानंतर जे घडलं त्यामुळं भाजपमधले काही लोक नाराज झाले असतील पण, फडणवीस यांच्या सारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याचं आम्ही भाग्य समजतो असं विधान भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ज्या हिंदुत्वाच्या विचारांवर आम्ही जगतो आहोत, त्याला गेल्या अडीच वर्षात तडा जात होता. यामुळं हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. सन २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावं आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीसांनी मोठा त्याग केला.
पण काही लोकांच्या हट्टामुळे ते झाले नाही. त्यामुळं हे एक प्रकारचं ऐतिहासिक सत्तांतर झालं असं म्हणावं लागेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की, एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. हे त्यांचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाचे एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री करुन पूर्ण केलं. त्यामुळं फडणवीसच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत असं विधान कुटे यांनी केलं आहे.