फडणवीसांकडून सत्तारांची कानउघडणी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ!

मुंबई : (Devendra Fadnavis On Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी केलेली शिवीगाळीचे आम्ही समर्थन करणार नाही. ते पुर्णपणे चुकलेच आहेत. यात काही दुमत असण्याचे कारण नाही. असं म्हणत अब्दुल सत्तार यांची उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी चांगलीच कानउघडणी केली असून मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार देखील केली आहे. त्यामुळे कृषिमंत्री सत्तारांची मंत्रीपद धोक्यात आलं आहे का? असं बोललं जात आहे. सध्या राजकरणात आरोप-प्रत्यारोप पातळी खूप खालच्या स्तराला जात असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी वादाची भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे राज्यात सत्तारांच्या विरोधात संतापाची गाट उसळली. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे काहीच करणार नाहीत, पण (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री सत्तारांचा राजीनामा घेणार का? असा रोखठोक सवाल उपस्थित केला आहे.

‘कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्या मंडळींना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे’. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली पाहिजे, असं म्हणत फडणवीस यांनी सत्तार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

औरंगाबादमध्ये बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. त्यामुळे त्यांच्यावर काल दिवसभर टीकेची झोड पहायला मिळत आहे.

Prakash Harale: