सरकार आपलंच, कोणी नाराज होऊ नका; फडणवीसांचे आमदारांना आवाहन

मुंबई : (Devendra Fadnavis On BJp MLA’s) गुरुवार दि. ३० रोजी शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचे नवीन सरकार कामाला लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना हे सरकार आपलंच असून कोणी नाराज होऊ नका असे अवाहन केले.

दरम्यान फडणवीस उपस्थित आमदारांना म्हणाले, येणाऱ्या २०२४ च्या लोकसभेच्या तयारीला लागा असे निर्देश दिले आहेत.भाजपचा कार्यकर्ता नाराज झाल्याच्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाध साधला. सरकार आपल्या हक्काचं आलं आहे, कोणीही नाराज होऊ नका, खचून जाऊ नका असं अवाहन केलं आहे. निधी वाटप व्यवस्थित होईल, पण जनतेत जाऊन काम करणं बंद करू नका, असे फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं काही आमदार आणि भाजप कार्यकर्ते नाराज होते. यावर बोलताना कोणीही नाराज होऊ नका, रखडलेली कामे मार्गी लावू, जर कोणाची कामे रखडत असतील तर मला सांगा, हे आपलं सरकार आहे त्यामुळं कोणी काळजी करू नका असं फडणवीस म्हणाले आहेत.

Prakash Harale: