मुंबई कोणाच्या बापाची नाही; कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले

मुंबई : (Devendra Fadnavis On CS Aswath Narayan) मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक आहेत, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहिर करा अशी मागणी कर्नाटकच्या (Maharashtra-Karnataka Border Dispute) मंत्र्यांनी केल्यानंतर, याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथ्य नारायण (C N Aswathya Narayan) यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई (Mumbai) महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जर कोणी दावा सांगत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन वारंवार कर्नाटक सरकारकडू होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत असून आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहित याचा निषेध व्यक्त करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री (Central Home Minister) यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे ती कोणाच्या बापाची नाही.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीचा निषेध केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

Prakash Harale: