“एकनाथ खडसेंनी तोंड काळं केलं नसतं तर…”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

मुंबई | Devendra Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज (27 जून) देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडलं. फडणवीसांना जळगावात काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा खडसेंनी दिला आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. एकनाथ खडसेंना आता नवीन मालक मिळाला आहे. त्यामुळे नवीन मालक जसं सांगेल तसंच खडसे वागतात, अशी टीका फडणवीसांनी केली.

“जर एकनाथ खडसेंनी जमिनीमध्ये काळं तोंड केलं नसतं तर आता त्यांच्यावर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती. ते आज आमच्या परिवारात राहिले असते. त्यांनी नवीन मालकाकडे जाण्याची गरज नव्हती. तसंच आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरत नाही. असे कितीही काळे झेंडे दाखवले तरीही आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण आम्ही जनतेसाठी काम करत असून जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही जळगावात आलो आहोत. त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sumitra nalawade: