नड्डांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची सारवासारव!

मुंबई : (Devendra Fadnavis On J P Nadda) पाटण्यामध्ये भाजपच्या दोन दिवसांच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. यावेळी जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यालयात खासदार आणि आमदारांना संबोधित करताना भविष्यात देशात एकही असा पक्ष उरायला नको, जो भाजपच्या विरुद्ध लढेल. जेणेकरून इतर सर्व राजकीय पक्ष संपून जातील, फक्त भाजपा उरेल, असे वक्तव्य जे पी नड्डा यांनी केले.

त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्रातदेखील संजय राऊतांविरोधातील कारवाईमुळे आधीच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून राज्यातही टीका केली जातेय. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांच्या या धक्कादायक वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना होती ती राहिलेली नाही. असे नड्डा यांना म्हणायचे होते. आता ही नविन शिवसेना झालेली आहे. जी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे त्या शिवसेनेसंदर्भात नड्डा बोलले आहेत. असे स्पष्टीकरण देत कृपाकरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नका. असे आव्हान माध्यमांना फडणवीसांनी यावेळी केले आहे.

Prakash Harale: