मुंबई : (Devendra Fadnavis On Kirit Somaiya) काही दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव ठाकरे सरकार गेलं असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचं असल्याचं केसरकर म्हणाले.
दरम्यान, ज्या पक्षात आम्ही घडलो, त्या पक्षप्रमुखांना भाजपनं नाव ठेवू नये व यापुढे असं वक्तव्य करु नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. या सर्व पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती दिली होती.
शिंदे गटानं या घेतलेल्या भुमीकेमुळं उद्धव ठाकरेंवर टीका करणं भाजप नेत्यांना अवघड जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोललं तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली होती. फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांचे कान टोचल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळं सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला भलतंच उत्तर दिलं आहे. मला हे समजत नाही की, २०१९ मध्ये ज्यांनी नरेंद्र मोदींच्या नावानं मतं मागितली. ते संजय राऊत विश्वासघाताची भाषा करतात, याचं मला हसायला येतंय, असं उत्तर सोमय्या यांनी दिलं आणि ठाकरेंवर बोलण्यास टाळलं.