रश्मी शुक्लांविरोधातील तपास बंद करून, फडणवीसांची ‘माविआ’वरच टीका! म्हणाले, “पोलीस अधिकाऱ्यांना सुपारी…”

मुंबई : (Devendra Fadnavis On Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत आहे. तसा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

यावेळी शुक्ला यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, “कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. तत्कालिन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना सुपारी देऊन रश्मी शुक्ला आणि अनेक अधिकाऱ्यांविरोधात कुंभाड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली.

“पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकार्‍यावर अन्याय करणार नाही. अथवा कोणत्याही अधिकार्‍यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Prakash Harale: