शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यावर एवढंच म्हणेन की…”

नागपूर | Devendra Fadnavis On Shivsena – सध्या राज्यात शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. भाजपकडून या युतीबाबत टीका केली जात असून शिवसेनेला याचा फायदा होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. आता यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

“उद्धव ठाकरेंसोबत आता कुणीही युती करायला तयार नाही, त्यांची अवस्था अशी झालीये की आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील”, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. याच दरम्यान आता देवेंद्र फडणवीसांनी देखील शिवसेनेला खोचक शब्दात टोला लगावला आहे.

 नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Sumitra nalawade: