मुंबई महापालिका ही शेवटची निवडणूक समजून लढा : उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबई : (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा अशा आवेशपूर्ण  शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपाटत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थित आज भाजपच्या 200 पदाधिकाऱ्याची मुंबईत बैठक पार पडली, यावेळी फडणवीसांनी मार्गदर्शन करताना पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आक्रमक भाषण केले. त्यांनी म्हटले की, संपूर्ण देशाला  चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Prakash Harale: