बाळासाहेबांच्या विश्वासू मोहऱ्याला फडणवीसांनी दिली मोठी जबाबदारी!

मुंबई : (Devendra Fadnvis On Eknath Shinde) एके काळी बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि नंतर राहूल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले तर, सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आशिष कुलकर्णी यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, कुलकर्णी यांच्यावर भाजप आणि शिंदे गटात समन्वय राखण्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गट आणि भाजपमधील आमदार तसेच मंत्र्यांमध्ये सूसूत्रता राखणे, शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवणे यासारखी कामे त्यांच्याकडे असतील.

कुलकर्णी हे शिवसेनेत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्यानंतर राहुल गांधी यांचेही ते विश्वासू मानले जात. ते तेथंही जास्त काळ रमले नाहीत, त्यांनी भाजपचा मार्ग आवलंबला. त्यांच्याकडे सध्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी आहे. मात्र भाजप नेत्याची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नेमणूक झाल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे. हे एक प्रकारे शिंदेंवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपनं केलेलं कारस्थान तर नाही ना हा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

Prakash Harale: