गुवाहाटी | Devoleena Bhattacharjee Marriage – ‘साथ निभाना साथिया’ ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील पात्र आणि डायलाॅग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यामध्ये ‘रसोडे में कौन था’ हा डायलाॅग तर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, याच मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारलेली आभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मात्र, तिनं लग्न कोणाशी केलंय हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. तसंच सध्या तिचे नववधूच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, तिचा मिस्ट्री मॅन कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलं नाही.
देवोलीनाच्या हळदीच्या कार्यक्रमाचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता देवोलीनानं स्वत:च तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो काही पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून देवोलीनानं लग्न केल्याचं स्पष्ट होतंय. ती नववधूच्या रुपात एका गाडीत बसलेली दिसतेय.
यातील एका फोटोमध्ये देवोलीनानं पतीचा हात हातात घेतला आहे. तसंच दोघांची साखरपुड्याची अंगठीही यात पहायला मिळत आहे. मात्र, पतीचा चेहरा तिनं लपवला आहे. देवोलीनाचे हे फोटो पाहून अचानक तिनं कोणाशी लग्न केलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, देवोलीनाच्या अकाऊंटवर विशाल सिंहसोबतचे फोटो पाहिले गेले आहेत. त्यामुळे तिनं त्याच्याशी लग्न केलं की काय, असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
View Comments (0)