सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली | Dhananjay Chandrachud – देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांनी आज (11 ऑक्टोबर) पुढील सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे सरन्यायाधीशपदावर लळीत यांच्यानंतर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं आहे.

उदय लळीत हे 8 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयानं परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तीची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे.

दरम्यान, धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते 10 नोव्हेंबर 2024 ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

Sumitra nalawade: