धनंजय महाडिक यांनी धरले राजू शेट्टींचे भर रस्त्यावर पाय

कोल्हापूर : (Dhananjay Mahadik Blessings On Raju Shetty) राज्यातील सहा राज्यसभा निवडणूकीचे निकाल काल जाहीर झाले. मात्र, तरी देखील राज्यात राजकीय हलचाली थांबलेल्या नाहीत. भाजप नेते धनंजय महाडिक यांनी राज्यसभा निवडणूकीत विजय मिळवला. दरम्यान कोल्हापूरला जात असताना कराड येथे रस्त्यावर त्यांची राजू शेट्टीं यांच्याशी भेट झाली. तेव्हा महाडिकांनी रस्त्यावरच शेट्टी यांचे पाय धरुन आशिर्वाद घेतले. त्यांच्या या भेटीचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, त्यांच्या या भेटीचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेनं राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, तरी देखील भाजप नेत्यांनं दाखवलेला हा मोठेपणा चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मिडीयामध्ये अनेकांकडून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तसेच धनंजय महाडिक यांच्या या चांगुलपणाचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. साम टिव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. धनंजय महाडिक यांनी रस्त्यावरच राजू शेट्टी यांना वाकुन नमस्कार करत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

Prakash Harale: