राज्यसभेचं मैदान मारल्यानंतर धनंजय महाडिकांचा सुचक इशारा; म्हणाले…

कोल्हापूर : (Dhananjay Mahadik On Satesh Patil) धनंजय महाडिक म्हणाले, संघर्ष हा महाडिकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार २०१९ मध्ये अस्तित्वात आलं असलं, तरी हे तिन्ही पक्ष महाडिकांविरुद्ध कोल्हापूरात लढल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार खासदार नाही, महापालिकेत सत्ता नाही, जिल्हा परिषदेत सत्ता होती, पण ती आता नाही. महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील १०० वर्ष राहिल असं सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे.

दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिक यांनी राज्यसभेचं मैदान मारल्यानंतर आज ते कोल्हापुरला जाणार आहेत. बालेकिल्यात त्यांच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरु असून, ही मिरवणूक अंबाबाई मंदिरात जवळ संपणार आहे. जिल्ह्याकडे येत असताना धनंजय महाडिक यांनी कराडमध्येच पालकमंत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

या वक्तव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. मागील अनेक पराभवानंतर महाडिक कुटुंबात विजय झाल्यानं जल्लोषी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा असणार आहेत. माजी आमदार महादेव महाडिक यांनी सुद्धा मुन्नाची मिरवणूक बघाच, असा सूचक इशारा काल दिला होता.

Prakash Harale: