मुंबई : (Dhananjay Munde On Vikram Kale) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात असल्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणे शक्य होत नाही. मात्र विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून राजकारणाच्या मैदानात उतरल्याचे दिसून आले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचारासाठी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले आहे. त्यांच्या या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी त्यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये विक्रम काळे यांचाच विजय होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते शिक्षक परळी वैजनाथ येथील प्राध्यापक मेळाव्यास संबोधित करत होते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले, “राह मे खतरे कितने भी हो लेकीन डरता कौन है. मौत कल आती है, आज आ जाए डरता कोन है. तेरे लष्कर के मुकाबले मै अकेला हूँ, फैसला मैदान मे होता है, मरता कौन है,” अशा खास शायराना अंदाजात ते बोलत होते.