धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, रूग्णालयात दाखल

परळी | Dhananjay Munde Car Accident – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. परळीत ही घटना घडली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातील मार लागला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच आता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत पाठवण्यात येणार आहे. (Dhananjay Munde Car Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (3 डिसेंबर) परळीतील (Parali) आझाद चौकात रात्रीच्या वेळी घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. तसंच हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसंच धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Sumitra nalawade: