शिक्षा भोगून बाहेर जाणाऱ्या बंद्याना व्यावसायिक प्रशिक्षण

धुळे : धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 व ईनर व्हील क्लब ऑफ, धुळे क्रॉसरोड जेन एक्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा व त्यांचे कुटुंबाचा (Family) उदरनिर्वाह व्हावा. या उद्देशाने जास्तीत जास्त बंद्याना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृह प्रशासनाने दिली आहे.

अप्पर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी( crime ) क्षेत्रातून बाहेर पडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. या उद्देशाने जास्तीत जास्त बंद्याना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून धुळे जिल्हा कारागृहातील बंद्यांकरता धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1, ईनर व्हील क्लब ऑफ धुळे, क्रॉसरोड जेन एक्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक स्वरूपात अल्प कालावधीचे बेकरी प्रशिक्षण (Training ) देण्यात आले.

Rashtra Sanchar Digital: