नवी दिल्ली | Dilip Tirkey – भारताच्या हाॅकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की (Dilip Tirkey) याची हाॅकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू दिलीप तिर्कीची आज (23 सप्टेंबर) हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपलं नामांकन मागे घेतल्यानंतर दिलीप तिर्कीची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
दिलीप तिर्कीनं आपल्या 15 वर्षाच्या दीर्घ कारकिर्दित भारताकडून 412 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, दिलीप तिर्कीने हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करणार’, असं ट्विट केलं आहे.
दरम्यान, दिलीप तिर्कीची हॉकी इंडियाच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननं (FIH) देखील त्याचं अभिनंद केलं आहे. तसंच ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, हॉकी इंडियाची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडणाऱ्या प्रशासन समितीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करते.’ अशा आशयाचे पत्र देखील त्यांनी पाठवलं आहे.