टी-20 मध्ये राडा घालणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंचा एकाच दिवशी क्रिकेटला रामराम!

cricket stadium 1cricket stadium 1

मुंबई – क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. एकाच दिवशी म्हणजे सोमवारी 18 जुलैला तीन मोठ्या खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक होणार आहे. त्याआधी खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एकाच दिवशी निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा स्टार खेळडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2019 मध्ये विश्वचषक इंग्लंडला जिंकून देण्यात स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीननं काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय. तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर रामदीननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

दरम्यान, वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज लेंडल सिमन्सनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली. याबाबत सीपीएलमधील त्रिनबगो नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली.

RashtraSanchar:
whatsapp
line