मुंबई – Dipali Sayyed on Devendra Fadnavis | पुण्यातील देहू येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टीका केली होती. यावरून आता आणखी राजकारण तापताना दिसत आहे. या वादात शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे.
देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव भाषणाच्या यादीतुन काढल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी, असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.