“तोच खरा वारसदार…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत!

मुंबई | Director Kedar Shinde’s Post In Discussionदिग्दर्शक (Director) केदार शिंदे (Kedar Shinde) हे प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते नेहमी विविध मुद्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेक बदल होताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलं असून सध्या ते चांगलंच चर्चेत आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, तो सांभाळतो, तोच खरा वारसदार!!, असं केदार शिंदे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे.

केदार शिंदेंची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तसंच त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. यामध्ये ‘छुपे विरोधक..पाठीवर वार करणारे..’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘आजची राजसाहेबांची मुलखात कशी वाटलं?’ असा प्रश्न कमेंट करत विचारला आहे. 

Sumitra nalawade: