रायपूर : (Disha Patani in Sidharth-Kiara Reception) बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता नेटकरी दिशाच्या लूकवर संतापले आहेत. नुकताच सिद्धार्थ आणि कियाराचा रिसेप्शन सोहळा पार पडला. यात अवघं बॉलिवूड हजर होतं. यावेळी अनेकांनी आपल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, याच सोहळ्यात दिशाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी नाकं मुरडली. सोशल मीडियावर देखील दिशा तिच्या या बोल्ड लूकमुळे टीकेची धनी झाली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिशाने देखील हजेरी लावली होती. 4यावेळी तिने शिमरी थाय हाय स्लिट गाऊन ड्रेस परिधान केला होता. दिशाने हा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे सोडले होते, तर हाय हिल्स देखील घातल्या होत्या. मात्र, या लूकमध्ये स्वतः दिशा देखील कम्फर्टेबल वाटत नव्हती. मीडियाला फोटो पोज देताना आणि चालत असताना ती सतत एका हाताने ड्रेस सावरताना दिसली. फोटोशूट करतानाही त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती.
या दरम्यानचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दिशा पटनीच्या अनकम्फर्टेबल ड्रेसकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. दिशा एखाद्या लग्नाच्या रिसेप्शनला असा ड्रेस घालून का आली आहे?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘हे लग्नाचे रिसेप्शन असून, एखादे कॅलेंडर शूट नाही’, असे देखील काहींनी म्हटले आहे. तर, काहींनी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी करत ‘ही तर बॉलिवूडची उर्फी जावेद’ असं म्हटलं आहे.