Disney+ Hotstar Down : एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असताना, ओटीटी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची सेवा ठप्प झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे, त्याचं ओटीटी प्रसारण Disney+ Hotstar वर होत आहे. पण अचानक युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत.
गेल्या तासाभरापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची सेवा बंद आहे. सेवा बंद झाल्यानंतर कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. डाऊन डिटेक्टरवरही मोठ्या प्रमाणात लोक याबाबत तक्रारी करत आहेत. केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही तर कंपनीची वेबसाइट hotstar.com देखील डाऊन आहे.
दरम्यान, मॅचच्या दिवशी अॅप डाऊन झाल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये संताप दिसून आला. अनेक क्रिकेटप्रेमी ट्वीट करून महत्त्वाची मॅच सुरू असतानाच हॉटस्टार बंद पडल्याने संताप व्यक्त करत आहेत. हॉटस्टार डाऊन झाल्याने ट्वीटरवर #HotstarDown हॅशटॅग ट्रेंड होत आहे.