कोथरूड : कोणत्याही सण-समारंभावेळी व अडचणीच्या वेळी आपले कर्तव्य बजावण्यात कधीही कसूर न करणारे सफाई कर्मचारी म्हणजे गाडगेबाबांचे शिष्यच. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरूड गुजरात कॉलनी येथील सफाई कर्मचार्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने हे वाटप केले गेले. यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले, ‘आपल्या आरोग्याची पर्वा न करता समाजाच्या स्वास्थ्यासाठी अहोरात्र कार्यरत असणार्या या आरोग्यदूतांना प्रोत्साहन देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. अत्यंत उत्साहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी कर्मचारीबांधवांच्या चेहर्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नाही.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड, प्रथमेश नाईक, तेजस बनकर, पृथ्वी दहीवल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.