इंजि. शिवाजी चाळक यांच्या ‘अंगत पंगत’ कवितासंग्रहाला राज्यस्तरीय मराठी बालकुमार साहित्य पुरस्कार जाहीर

पुणे | समाज सुसंस्कृत नागरिकाची अपेक्षा करतो. त्यामुळे बालकांकडून फार अपेक्षा ठेवल्या जात आहेत. मात्र बालकांना आपण काय देत आहोत याचाही विचार करण्याची गरज आहे. बालसाहित्याची फक्त निर्मिती करून चालणार नाही तर उत्तमोत्तम बालकुमार साहित्य निर्माण व्हावे यासाठी अनेक स्तरातून बालकुमार साहित्यिकांना पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. त्यापैकीच एक असलेल्या अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून दर वर्षी बालसाहित्याला पुरस्कार देण्यात येतात. संस्थेचे 2021 आणि 2022 या वर्षांसाठीचे बालसाहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातून सुमारे 200 पुस्तके संस्थेकडे प्राप्त झाली होती. यामध्ये कथा, कविता, एकांकिका, कादंबरी, विज्ञान लेखन, चरित्र या पुस्तकांचा समावेश आहे. यातून बालसाहित्याचे परीक्षण कार्यकारिणी सदस्य आणि कवयित्री कविता मेहेंदळे, मीरा शिंदे आणि सीमा चव्हाण यांनी केले व पुरस्कारांची निवड केली. मे महिन्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे आणि कार्यवाह डॉ. दिलीप गरुड यांनी दिली.

बालसाहित्य पुरस्कार पुढीलप्रमाणे :

कवितासंग्रह : शिवाजी चाळक (अंगत पंगत)

कथासंग्रह : संजय गोराडे (कोवळे कोंब)

समाधान शिकेतोड (जादुई जंगल

वीरभद्र मिरेवाड (आनंदाची फुलबाग)

बालएकांकिका : रमेश कोटस्थाने (रंग माझा वेगळा)

विज्ञान लेखन : सिद्धेश्वर म्हेत्रे (अभिनव विज्ञान प्रयोग)

विद्यार्थी वाङ्मय : पूर्व प्रा. शाळा, तिवरे

कादंबरी : सावित्री जगदाळे (जंगलवाट)

चरित्र : रघुराज मेटकरी (डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी).

Dnyaneshwar: