तुमची मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

चंद्रपूर – Supriya Sule on CM | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज चंद्रपूरमध्ये गेल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना, आम्हाला कधी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला पहायला मिळेल का?, असा सवाल करण्यात आला.

 मी लोकसभा लढतेय, तुम्हाला नागरिकशास्त्राची जाण असेल. 2024 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला एवढीच विनंती करेल की, मला बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तिकीट द्यावं, असं उत्तर सुप्रिया सुळेंनी होत जोडून दिलं.

दरम्यान,  मी ‘अम्मांना’ भेटायला आले आणि त्यांच्या अम्मा का डब्बा प्रकल्पाच्या प्रेमात पडले. एका कतृत्वान आईने शून्यातून सगळं उभं केलं. त्यांनी सुरु केलेला हा डब्बावाला प्रकल्प फारच सुंदर असून मी त्यांच्या कामाच्या प्रेमात पडले असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

RashtraSanchar: