वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेकडून डॉक्टरांचा सन्मान

शिक्रापूर : प्रत्येक ठिकाणी डॉक्टर हे जिवाची बाजी लावून नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत असतात, कोरोना काळामध्येदेखील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे. डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे असल्याचे मत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर ता. शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था शिरूर तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते.

याप्रसंगी विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, उपसरपंच मयूर करंजे, धानोरे ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई येवले, खरेदी विक्री संघाचे राजेंद्र नरवडे, वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, बाळसाहेब मोरे, अमोल कुसाळकर, नितीन वाळिंबे, उद्योजक अमित राऊत, सचिन धुमाळ, प्रवीणकुमार जगताप, एन, बी. मुा यांसह ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी यांसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
डॉ. अर्चना शेंडे, वैद्यकीय अधिकारी
डॉ. वैजिनाथ काशिद, डॉ. हेमा देठे, डॉ. रवींद्र टेमगिरे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. नितीन सोनवणे, डॉ. प्रदीप थोरात, डॉ. पवन सोनवणे, डॉ. शरद लांडगे, डॉ. राजीव कोपुळवार,
डॉ. भाऊसाहेब पोळ, डॉ. दीपक पाटील,
डॉ. धनंजय खेडकर, डॉ. किरण चपाई,
डॉ. अविनाश रूके, डॉ. चंद्रकांत केदारी,
डॉ. सोनाली लांडगे, डॉ. सुप्रिया गावडे,
डॉ. स्मिता टेमगिरे, डॉ. सुहास निकम,
डॉ. संदीप वाव्हळ यांचा पुरस्कार देत विशेष सन्मान करण्यात आला.

Sumitra nalawade: