कोलंबो : सध्या श्रीलंकेत मोठं संकट आलेलं आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होऊन राजकीय नेत्यांच्या घरावर आंदोलने करत आहेत. आंदोलकांनी श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे निवासस्थान, टेम्पल ट्रीमध्ये घुसून आग लावली होती. यानंतर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष हेलिकॉप्टरने त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतला आहे. परंतु, या नौदल तळालाही आंदोलकांनी वेढले आहे.
दरम्यान, पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिंदा हे भारतात पळून गेल्याचीही अफवा पसरली होती. मात्र श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी निवेदन जारी करत हे वृत्त फेटाळून लावले.