प्रकल्पांना घाई नको, नागरिकांशी चर्चा करा-चंद्रकांत पाटील

chandrkant patil emagechandrkant patil emage

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे. नळ स्टॉप येथील उड्डाणपुलामुळे मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत असते यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. यासंदर्भात आता चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे कि, नळ स्टॉपचा उड्डाणपूल झाला नसता तर भीषण स्थिती निर्माण झाली असती, पूल पाडणे हे या प्रश्नाचं उत्तर नाही. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या तर आता कोंडी कमी झाली आहे. तरीही हा प्रश्‍न संपलेला नाही. यावर आजून मार्ग काढला जात आहे. पण त्यावर नागरिकांशी चर्चा करून शंकांचे निरसन करून मगच निर्णय घेण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच कर्वे रस्‍त्यावरील उड्डाणपूल, वेताळ टेकडीवरील भुयारी मार्ग व रस्त्यावर नागरिकांचे जे काही आक्षेप असतील ते ऐकून घ्यावेत. तसंच सध्या प्रशासन त्याचा डीपीआर तयार केला जाणार आहे, हा रस्ता झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागला जाईल. बावधन येथील कचरा हस्तांतराचा प्रकल्प होऊ नये असं आम्ही प्रशासनाला सांगितले आहे. लोकांचे समाधान झाल्याशिवाय हा प्रकल्प सुरू करू नये, असं आयुक्तांना सांगितलं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्‍नांसंदर्भात महापालिकेत प्रशासक, आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी पाणी समस्यांवरही भर दिला. ‘‘२३ गावांमधील नवी बांधकामांना पुरवठा करण्यासाठी बिल्डरने पाणी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. तर महापालिकेची समान पाणी पुरवठा ही योजना पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्ष लागणार आहे. तो पर्यंत बिल्डरने आर्थिकभार उचलावा.

Nilam:
whatsapp
line