मुंबई : आयपीएल च्या १५ व्या हंगामातील आज रविवार डबल धमाका सामना होत आहे. या हंगामातील ५४ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोल्ही खातं न उघडताच बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. डू प्लेसिसनं 34 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक केलं.
दरम्यान, प्ले-ऑफच्या शर्यतीचा विचार करता हा सामना रंजक होणार आहे. रजत पाटीदार आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी डाव सावरला. पॉवरप्लेमध्ये बंगळुरूने एका विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची निराशा केली आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विराट बाद झाला. आयपीएल २०२२ मधील हे त्याचे तिसरे गोल्डन डक आहे. सध्या बंगलोरचे ११४ वर २ बाद १४ ओव्हर अशी स्थिती आहे.