“चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झालंय”- देवेंद्र फडणवीस

मुंबई | Mahaparinirvan Din 2022 – आज (6 डिसेंबर) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं आहे. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही, असं संविधान त्यांनी दिलं आहे. तसंच चहावाल देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेबांमुळेच झालेलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

“मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं आहे. व्यक्तीला सामान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलंय. आज आपला देश प्रगती करत आहे कारण लोकशाही जिवंत आहे. ‘एक मार्ग एक संधी’ संविधानानं उपलब्ध करुन दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगानं सुरु आहे. मी आज राज्य सरकारच्या वतीनं आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल.”

Sumitra nalawade:

View Comments (0)